Wednesday, August 30, 2017

गणपतीची मुर्ती कशी असावी


*गणपतीची मुर्ती कशी असावी*

१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,

२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,

३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.

४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,

५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,

६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,

७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी.
विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,

८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.

९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून गणपती विसर्जन करून घ्यावे, एखाद्या वर्षी उत्सवातचे दिवस कमी झालेले चालतील.

१०) घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ति विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे. गर्भवती महिला घरात असता भाद्रपद शु. चतुर्थीस  बसवलेला गणपति विसर्जन न करण्याची काही ठिकाणी रुढ आहे ती शास्त्र संम्मत नाही . चतुर्थीला बसवलेला गणपति आपल्या कुलाचारा प्रमाणे ठरवलेल्या दिवशी विसर्जन करावा, वर्षभर तसाच ठेवु नये .   

११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,

१२) श्री गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारी
(कोणत्याही वारी) तसेच कोणत्याही नक्षत्र
असतांना करावे.

पदाचा, संपत्तीचा कधी गर्व करू नये

😵😵

माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ हे आपल्या आमदारकीच्या मताची किंमत ओळखून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधान भवनात आल्याचे टीव्हीवर पाहिले.

पांढरीशुभ्र दाढी वाढलेली.
अतिशय थकलेले.
डोक्यावर कानटोपी घातलेली.
एकेक पाऊल सांभाळत चाललेले.
विधान भवनातील पायऱ्या चढतानाही धाप लागत होती.

कोणी विचारले, ' कसे आहात ?' तर फक्त ' ठीक आहे ' इतकेच बोलले.

त्यांनी जवळपास 8 हजार कोटींची माया जमवली.
साखर कारखाना विकत घेतला.
परदेशात खाण आहे.
मुलाला आमदार बनवले.
पुतण्याला खासदार बनवले.
घरात असलेले पोस्टर काही कोटींचे आहेत.
नाशिक मध्ये मोठमोठे महाल आणि भुजबळ नॉलेज सिटी आहे.
बंगले कोट्यवधींचे आहेत.

इतकी वर्षे वैभवात राहीलेला आणि बाळासाहेब ठाकरेना आव्हान देणारा हा निधड्या छातीचा वाग गलितगात्र /  हवालदिल झालेला पाहून मन खिन्न झाले.

सामान्य कैद्यांसारखे जीवन जगतो आहे.
गाद्यागिरद्यांवर झोपणारा जमिनीवर झोपतो आहे.
तुरुंगातून बाहेर येण्याची धडपड करतो आहे.

पण आपल्या वैभवाचे सुख घेऊ शकत नाही. थोडासा आराम करावा म्हणून दवाखान्यात ऍडमिट झाले तर त्यांच्यावर आरोप होतात आणि पुन्हा तुरुंगात जमिनीवर झोपायला पाठवतात.

मनसेचे तत्कालीन आमदार गोल्डन मँन रमेश वांजळे दोन - अडीज किलो सोने अंगावर घालायचे. एका क्षणात मृत्यूने कवटाळले.

अर्धे जग जिंकलेला आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, ' मी मरेल तेंव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा, जगाला कळू द्या, जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर खाली हात गेला.

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनपार्ट वाटरलूच्या तुरुंगात खंगुन खांगुन मेला.

जर्मनीचा शहेनशहा ज्याने दुसरे महायुद्ध घडवले त्या एडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली.

इराकचा बादशहा सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली. नको तीतकी संपत्ती गोळा केली. शेवटी फासावर लटकावे लागले.

आपल्या वडिलाला ( शाहजहानला ) तुरुंगात टाकून, भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या, भारतावर साम्राज्य असलेल्या बादशहा औरंगजेबाच्या समाधी कडेही कोणी बघत ही नाही.

एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुसोलिनीला झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले.

फ्रांसची हुकूमत ताब्यात असलेल्या 16 व्या लुईला लोकांनी गिलोटिनवर चढवले.

कार्ल मार्क्सला डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले.

जगाला आपल्या अभिनयाने हसवणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला.

भल्याभल्यांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मंरो ही अति मद्य सेवनाने मेली.

मनोरंजनातून लोकांच्या जीवनावर राज्य करणारे राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, ए के हँगल, परवीन बाबी, माला सिन्हा यांचे मृत्यू आठवा.

इंदिरा गांधी, राजीव गांधी, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचे मृत्यू आठवा.

काय कमी होते यांच्या कडे ? काहीच नाही ना?

*सांगायचा उद्देश की,* पदाचा, संपत्तीचा कधी गर्व करू नये. आयुष्य कितीही वैभवात काढले तरीही मयत त्याच मांजरपाट कपड्यात नेले जाते. कोणी तरी म्हटले आहे, *' कफन ब्रँडेड नही होता.'*

आपल्या कडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल.
पण माणुसकीने मिळवलेली माणुसकीच साथ देईल.

आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका.

*शेवटी एकच सांगतो, जीवन सुंदर आहे,👌 आनंदाने जगा व जगू दया.. आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा.. नेहमी मदत करा,🤝 , दुसर्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.. प्रत्येकाला शेवटी तिथेच जायचे आहे... जिथे परत येण्याचा रस्ताच नाही...So 😊Always life is beautiful, be happy.😊Means "Life OK"👍🏻*
💐🙏💐
पटलं तर नक्की सांगा व लगेच पुढे पाठवा...

शेखचिल्ली

मुल्ला नसरुद्दीनने बाजारात एक गाढव पसंत केलं आणि शेखचिल्लीला,
त्या गाढवाच्या मालकाला सौद्याचे शंभर रुपये देऊन गाढव दुसऱ्या
दिवशी घरी पोहोचवायला सांगितलं...

...दुसऱ्या दिवशी सकाळी शेखचिल्ली तोंड पाडून आला... म्हणाला,
मुल्लाजी, तुम्ही खरेदी केलेलं गाढव काल रात्रीच मेलं.

मुल्ला म्हणाला, ठीकाय मग. मला शंभर रुपये परत दे. मी दुसरं
गाढव खरेदी करतो.

शेखचिल्ली म्हणाला, मी ते काल रात्रीच खर्च केले, एकाचं देणं भागवलं.

मुल्ला म्हणाला, मग निदान ते मेलेलं गाढव तरी आणून दे इकडे.
मात्र, ते रात्रीच्या वेळी, गुपचूप घेऊन ये कुणाला न सांगता.

पुढच्या आठवडी बाजारात शेखचिल्ली मुल्लाला भेटला. अतिशय
खुषीत दिसणाऱ्या मुल्लाला तो म्हणाला, त्या मेलेल्या गाढवाचं
तुम्ही केलंत काय?

त्याला मी लॉटरीत बक्षीस म्हणून देऊन टाकला, मुल्ला म्हणाला.

म्हणजे? शेखचिल्लीने विचारलं.

अरे, मी दोन रुपयांत गाढव जिंका म्हणून लॉटरी सुरू केली. पाचशे
लोकांनी तिकीटं काढली. त्यातला एक जिंकला. त्याला सांगितलं,
ते गाढव मेलं. तो म्हणाला, माझे दोन रुपये परत दे. ते दिले.
९९८ रुपये माझ्या खिशात!!!
...
...
...मुल्लाला आता जिओ कंपनीमध्ये बिझनेस हेड म्हणून मोठ्या
पगाराची नोकरी मिळालीये म्हणे!!!!

(व्हॉट्सअॅपवरून आलेली कथा बहुजनहितार्थ भाषांतरित केली आहे.)
😉😉😉

एकमेव मंदिर गणपतीचे पूर्ण कुटुंब

भारतातील एकमेव मंदिर जिथे गणपतीचे पूर्ण कुटुंब विराजमान आहे

गणपती

५ पत्नी ऋद्धि, सिद्धि, पुष्टि, तुष्टि, श्री.

२ मुलगे शुभ आणि लाभ

२ नातू अमोद, प्रमोद

ठिकाण विद्याधाम इंदौर

हुतात्मा राजगुरुंची " राजगुरु जयंती "

पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते.
परंतू "राजगुरू"मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही.
ही काय दर्जाची उपेक्षा. म्हणायची......?

या महायोद्ध्याला तर चित्रपटातही विनोदी पात्र बनून राहाणेच नशिबी आले.
           
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता.

ते इतके निष्णात होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.

कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता.
नेमबाजीत ते शब्दवेधी होते, एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).

स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम (स्टॅमिना) होता. तासनतास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत, दंश झाले तरीही चेहर्यावरील रेषही न हलवता.

एकदा तर त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली, लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला - हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हुं की चूं देखील केले नाही! आणि त्याहूनही मोठी गोष्ट सांगतो.

साँडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंहांना शंका वाटत होती, परंतू राजगुरूंनी मात्र भगतसिंह नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी साँडर्सच्या दोन भूवयांच्या बरोब्बर मधोमध कपाळातून आरपार गेली. त्यांना परत लक्ष्याकडे पाहायचीही आवश्यकता भासली नाही.

विश्वास न बसून भगतसिंहांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या! असे होते राजगुरू!

(आज हुतात्मा राजगुरुंची इंग्रजी तारखेप्रमाणे जयंती. त्यानिमित्त पूर्वी लिहिलेल्या एका लेखातील हा संपादित अंश.)
संकलीत लेख.
  
      💐💐💐💐 हुतात्मा स्वातंत्रवीर मर्द मराठी विर "राजगुरु जयंती"निमित्त अभिवाद

चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट

_*||जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ||*

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील,

चहाचे दुष्परिणाम....

१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

२. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो. खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही .

*दिवसातून एक तरी अशी पोस्ट टाका जेनेकरून ती पोस्ट सर्वांच्या उपयोगी पडेल* जनहितार्थ

Eye opener for all intelligent Indians

Brushing with *Colgate*

Shaving with *Gillette*

Bathing with *Pears*

Aftershave with *Old Spice*

Wearing *Jocky*
underwear

Wearing a
*Van heusen* shirt

Wearing a *Levis* pant

Eating *Maggi* and

Drinking *Nescafe*

Using a *Samsung* phone

Wearing a *Ray-ban*

Seeing time on *Casio*

Moving on a *Honda* bike

Using *Apple computer*

with *Coke* on the side

Finishing lunch at ,
*McDonald's*

Buying Pizza  for the
wife from *Dominos*

And...,

Then asking a question,
*"WHY IS THE INDIAN*
*RUPEE GOING DOWN*
*AGAINST THE DOLLAR*

Thats why Modi says MAKE IN INDIA

*Eye opener Message for all intelligent Indians.*

स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा

स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा

​एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.

त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की ‘जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.’
हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.

शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, “काय रे, उडाला काय गरुड?” तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!
त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, “अरे, तू हे कसे केलेस?”

तेव्हा शेतकरी म्हणाला, “मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!”

आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!

मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!

अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!

ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!

मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो…
तुमच्या प्रगतीत साथ देणारा तुमचा मित्र!

मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा, सत्त्वगुण

पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून झालेली पापे नाहीशी करण्यासाठी व मनःशुध्दीसाठी त्यांनी तीर्थस्नानांची यात्रा करण्याचे ठरविले.
श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व त्याची संमती घेण्यासाठी सर्व पांडव त्याच्याकडे गेले.
श्रीकृष्ण म्हणाला, "जात आहात तर जा. परंतु...मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची फांदी देतो. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."
पांडव त्यानंतर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्नान करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.
तीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व पांडवांनी श्रीकृष्णाची भेट घेतली व त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले, ..
"आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले.".
श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे तुकडे करुन सर्वांना खावयास दिले व म्हणाला,.
"प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."
सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच केले.
कारण प्रसादाची चव कडूच होती.
श्रीकृष्णाने विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान करुनही कडूनिंबाची चव गोड झाली का ?"
“कशी होईल? स्नान घालून बाह्य बदल होईल. आतला कडूपणा कसा जाईल?"
धर्मराजाने प्रश्न केला.
श्रीकृष्ण म्हणाला,
"तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल परंतु मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी कशी होईल? त्यांचा संबंध
सदाचरणाशी, सदगुणांशी आहे."
मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा, सत्त्वगुण
यांनी सुस्नान व्हावे ..
तीर्थस्नानांने नव्हे..
[ ! जय श्रीकृष्ण ! !

Wednesday, August 23, 2017

श्रीगुरु श्रीपाद वल्लभ स्वामी जंयती माहिती

श्रीगुरु श्रीपाद वल्लभ स्वामी जंयती माहिती

दिनांक  २५/०८/२०१७ रोजी शुकवारी भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला या दिवशी श्री दत्तात्रेय याचे प्रथम अवतार श्री अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्रीगुरू श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज जंयती आहे
॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्रीगणेश आणि भगवान दत्तात्रेयांचा आद्य अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ या दोघांचाही जन्म भाद्रपद शुल्क चतुथीर्चा. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्ती सार्मथ्याच्या पलिकडे असलेले विशिष्ट चतुर्थतत्व ज्यांना ज्ञात आहे असे परमात्मा म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो

सर्व प्रथम आपणास माहीतच असेल की या कलयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा,विष्णु,शिव या त्रिमूर्तीनी श्री दत्तात्रय याचा अवतार घेतला. ब्रम्हदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील.तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परम्परेचे मुळं पीठ आहे
.
         आता श्रीदत्तात्रेय या पासून पुढे तिन अवतार झाले प्रथम श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार द्वितीय श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्रीगुरू दत्तात्रेय याचे आहेत 

श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला झाला.
गणेश चतुर्थी ला झाला.कृष्ण-यजुर्वेद शाखा आपस्तंब सूत्र,
भारव्दाज गोत्र भव ब्रह्मश्री घंडिकोटा अप्पालराज शर्मा आणि
महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. या अवताराची माहिती
गुरुचरित्रात, पाच,आठ,नऊ.व दहा या चार अध्यायात आलेली आहे.

श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात
पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यान्गताची ती मनोभावे सेवा करीत असे.दोघेही सत्वगुणी होते.ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राम्हण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करुं त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिमे श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला.प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले,
"माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे॥
"माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.  
तुला जे हवे असेल ते माग."

श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त्प्रभूंना म्हणाली, "भगवंता, आपण मला 'जननी' म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा.मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा."
सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्त्प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, "माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही जो सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल." असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदुष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.
काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतला. सुमतीने त्याला सगळी हकीगत सांगितली. मध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्यला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीगत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, "तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल.

पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली. तिअल एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खुप दानधर्म केला. विद्वान ब्राम्हणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. 'हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.' असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्य्नात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव 'श्रीपाद' असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते.

यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग आपाळराजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी आणेल लोक पीठापुरास येऊ लागले.

श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते म्हणाले, "मी विवाह करणार नाही.मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे.मी तापसी ब्रम्हचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय.माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे." हे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु 'तुला ज्ञानी पुत्र होईल.तो सांगेल तसे वागा.' हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आई-वडील त्यांना म्हणाले, "बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवीत नाही." आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, "तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल." मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पहिले . आणि त्याचक्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. 'आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.' असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला.

"तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल . तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल." मग ते आई-वडिलांना म्हणाले, "या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक साधुनानांना मी दीक्षा देणार आहे."

सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले एकेकी गुप्त झाले.
'श्रीगुरुचरित्र' या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्रीनृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवातर चांगले माहीत आहेत. पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्री वल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापूरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला धांडोळा उद्बोधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. त्यांचे समकालीन असलेल्या शंकर भट्ट यांनी लिहिलेले चरित्र संस्कृत भाषेत होते आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद झाला.

पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वत:ला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्त्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनर्दानाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि अनेक गोष्टींचा संदेश दिला. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदान्दात प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले.

पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूतीर्च्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. तेथे भक्तांना अभिषेक करता येतो. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत. पीठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुक्कुटेश्वराचे दगडी मंदिर आहे. त्यासमोरच एक तलाव आहे
(नृसिंहसरस्वती  आणि स्वामी  समर्थ  यांचा  जन्मसंकल्प)
समस्त  कल्याणकारी  गुणांनी  युक्त  अशा  वासवांबिकेस  श्रीपाद  प्रभू  म्हणाले  ''तुझा  संकल्प  सिध्द  होईल  !  मी  आणखी  14  वर्षे  म्हणजे  या  शरिराला  30  वर्ष  येईपर्यंत  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  रूपांतच  राहून  त्या  नंतर  गुप्त  होईन.  त्यानंतर  संन्यास  धर्माच्या  उध्दाराच्या  निमित्ताने  नृसिंहसरस्वती  ह्या  नावाने  ओळखला  जाईन.  ह्या  दुसऱ्या  अवतारात  80  वर्षे  राहीन,  या  अवतार  समाप्तीनंतर  कर्दळी  वनात  300  वर्ष  तपोनिष्ठेत  राहून  प्रज्ञापुरात  (अक्कलकोट)  स्वामी  समर्थ  या  नावाने  अवतार  धारण  करीन.  अवधूत  अवस्थेत  सिध्दपुरुषांच्या  रूपाने,  अपरिमित  अशा  दिव्यकांतीने,  अगाध  लीला,  दाखवीन.  साऱ्या  जगाला  धर्म  कर्माला  अनुसरून,  त्या  विषयी  आसक्तीरहित  करीन.''
नमो सदा श्रीगुरू श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज