*गणपतीची मुर्ती कशी असावी*
१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,
२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,
३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.
४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,
५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,
६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,
७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी.
विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,
८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.
९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून गणपती विसर्जन करून घ्यावे, एखाद्या वर्षी उत्सवातचे दिवस कमी झालेले चालतील.
१०) घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ति विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे. गर्भवती महिला घरात असता भाद्रपद शु. चतुर्थीस बसवलेला गणपति विसर्जन न करण्याची काही ठिकाणी रुढ आहे ती शास्त्र संम्मत नाही . चतुर्थीला बसवलेला गणपति आपल्या कुलाचारा प्रमाणे ठरवलेल्या दिवशी विसर्जन करावा, वर्षभर तसाच ठेवु नये .
११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,
१२) श्री गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारी
(कोणत्याही वारी) तसेच कोणत्याही नक्षत्र
असतांना करावे.
No comments:
Post a Comment