मुल्ला नसरुद्दीनने बाजारात एक गाढव पसंत केलं आणि शेखचिल्लीला,
त्या गाढवाच्या मालकाला सौद्याचे शंभर रुपये देऊन गाढव दुसऱ्या
दिवशी घरी पोहोचवायला सांगितलं...
...दुसऱ्या दिवशी सकाळी शेखचिल्ली तोंड पाडून आला... म्हणाला,
मुल्लाजी, तुम्ही खरेदी केलेलं गाढव काल रात्रीच मेलं.
मुल्ला म्हणाला, ठीकाय मग. मला शंभर रुपये परत दे. मी दुसरं
गाढव खरेदी करतो.
शेखचिल्ली म्हणाला, मी ते काल रात्रीच खर्च केले, एकाचं देणं भागवलं.
मुल्ला म्हणाला, मग निदान ते मेलेलं गाढव तरी आणून दे इकडे.
मात्र, ते रात्रीच्या वेळी, गुपचूप घेऊन ये कुणाला न सांगता.
पुढच्या आठवडी बाजारात शेखचिल्ली मुल्लाला भेटला. अतिशय
खुषीत दिसणाऱ्या मुल्लाला तो म्हणाला, त्या मेलेल्या गाढवाचं
तुम्ही केलंत काय?
त्याला मी लॉटरीत बक्षीस म्हणून देऊन टाकला, मुल्ला म्हणाला.
म्हणजे? शेखचिल्लीने विचारलं.
अरे, मी दोन रुपयांत गाढव जिंका म्हणून लॉटरी सुरू केली. पाचशे
लोकांनी तिकीटं काढली. त्यातला एक जिंकला. त्याला सांगितलं,
ते गाढव मेलं. तो म्हणाला, माझे दोन रुपये परत दे. ते दिले.
९९८ रुपये माझ्या खिशात!!!
...
...
...मुल्लाला आता जिओ कंपनीमध्ये बिझनेस हेड म्हणून मोठ्या
पगाराची नोकरी मिळालीये म्हणे!!!!
(व्हॉट्सअॅपवरून आलेली कथा बहुजनहितार्थ भाषांतरित केली आहे.)
😉😉😉
No comments:
Post a Comment